Skip to main content

Posts

Showing posts with the label मराठी

मृगजळ एकांकिका स्पर्धा

काल मी माझ्या शाळेतल्या मित्रांबरोबर मृगजळ एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पाहण्यास गेलो होतो. तिकीट काढण्यावरून झालेला गोंधळ माझ्या नेहमीच लक्षात राहील. त्या बद्दल इथे मी काही जास्त सांगणार नाही. अंतिम फेरीत पाच एकांकिका होत्या. त्यातली पाचवी एकांकिका - "HTTP 404 Page Not Found" - आम्ही आधीच सवाईच्या वेळी पहिली होती. चवथ्या एकांकिकेबद्दल आमच्या मनात बरेच कुतूहल निर्माण झाले, कारण त्या एकांकिकेचा नाव होतं - "बी. पी." :) पहिल्या एकांकिकेचा नाव होतं, "थरारली वीट". एका लहान मुलीच्या पहिल्या आळंदीच्या वारीत तिला येणारे अनुभव, तिच्या आयुष्याला मिळणारी कलाटणी, तिच्या आईबद्दलचं तिला कळणारे सत्य याचे हृदयद्रावक वर्णन या एकांकिकेत होते. "गिरगाव व्हाया दादर" या एकांकिकेचा लेखक हृषीकेश कोळी यानेच हि एकांकिका लिहिली आहे. (सवाईच्या वेळच्या "एम डी करतंय सादर, गिरगाव व्हाया दादर" ह्या घोषणा माझ्या कायम स्मरणात राहतील) दुसरी एकांकिका सदर केली होती जोशी-बेडेकर कॉलेजने - "अलगद". ही गोष्ट होती प्रेमात "तोंडावर" पडलेल्या एका तरुणीची. ह्...

So true…

जगण्याच्या वारीत मिळे ना वाट साचले मोहाचे धुके घनदाट आपली मानसं आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती…. (चित्रपट: झेंडा)