तशी माथेरानची सहल नेहमीसारखीच होती. मी, विराज आणि सुस्मित यांनी बऱ्याच जणांना फोनाफोनी केली. पण अखेर आम्ही पाच जणच उरलो – मी, विराज, सुस्मित, आदित्य, ज्ञानेश. तसं आमच नशीब चांगलं होत, म्हणून आम्हाला ऐन वेळी ५.४० ची कर्जत लोकल मिळाली. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेन सुटली, पुढची ट्रेन एका तासानंतर होती!! पुढचा प्रवास तसा “as planned” झाला. माथेरान हे ठिकाण तसं काही मला बरंच आवडलं असं नाही. माथेरानला जायची सर्वोत्तम वेळ म्हणजे पावसाळ्याचा शेवट किंवा हिवाळा, पण आम्ही गेलो भर उन्हाळ्यात! चालत चालत बरेच हिंडलो. इतके चालूनसुद्धा आम्ही चालत नेरळ गाठण्याच ठरवलं. ते का ठरलं मला अजूनही कळत नाही… दुसऱ्या दिवशी पाय असे मोडून आले होते की विचारू नका… एक महत्वाची गोष्ट ह्या सहलीत घडली ती म्हणजे मी, सुस्मित, विराज आणि आदित्य चौघे ज्या प्रकारे एकमेकांवर बोलण्यात कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होतो. बिचारा ज्ञानेश संपूर्ण वेळ बघ्याची भूमिका घेत होता :)
इंद्र जिमि जंभ पर… बाडव सुअंभ पर… रावण सदंभ पर… रघुकुलराज है ! पौन बारिबाह पर… संभु रतिनाह पर… ज्यों सहसबाह पर… राम द्विजराज है ! उदरात माउली… रयतेस साउली… गडकोट राउळी… शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा… युक्तीची यंत्रणा… खल दुष्टदुर्जना… प्रलयंकर हा संतास रक्षितो… शत्रू निखंदतो… भावंडभावना… संस्थापितो ऐसा युगेयुगे… स्मरणीय सर्वदा… माता-पिता-सखा… शिवभूप तो दावा दृमदंड पर… चीता मृगझुंड पर… भूषन वितुंड पर… जैसे मृगराज है ! तेज तम अंस पर… कान्ह जिमि कंस पर… त्यों मलिच्छ बंस पर… सेर सिवराज है ! जय भवानी, जय शिवाजी ! Thanks to Nik for sending this. In case any of you want to read the whole poem you can visit this link .
Comments