२ आठवड्यांपूर्वी मी माझ्या मित्रांना गवालिया टंकला भेटलो होतो, त्या वेळीचे हे संभाषण…
मित्र १: अरे त्यादिवशी आपल्या मध्ये क्ष गोष्ट ठरली होती ना. सिध्देश तुला माहित नव्हत काय?
सिध्देश: (प्रश्नार्थक चेहरा ठेवण्यचा प्रयत्नात) नाही रे…
मित्र २: माहित आहे रे त्याला, acting करत आहे तो
सिध्देश: ही काय फालतुगिरी आहे? तूच तर मला म्हणाला कि १ ला सांगू नकोस की तू मला हे सांगितल आहेस.
मित्र २: अरे हो पण नंतर मी सांगितलं त्याला कि तुला माहित आहे जे आम्हा दोघांना माहित आहे
मित्र १: पण मला त्याच्या आधी माहित होते कि सिध्देशला माहित आहे. तोच मला म्हणाला होता.
सिध्देश: मी कधी म्हणालो?
मित्र १: त्या दिवशी, blah blah
सिध्देश: ohh, त्या वेळी!!! पण मला तर blah blah अस सांगायचा होतं तुला. तू काही भलताच अर्थ घेतलास.
मित्र १: हो आणि मला वाटल कि तुला सर्व माहित आहे.
सिध्देश: (नेहमीपेक्षा जरा जास्त confused होउन) अरे हो पण मला माहित नव्हतं की तुला माहीत आहे कि मला माहित आहे तुमच्याबद्दल….. (Now totally lost in what he said) (हशा)….
Comments