Yep, I am boasting about myself again. After all, it is my blog, no? There are 2 papers which I will always remember for the kind of satisfaction they brought to me. Nopes, they were not from the 10th or 12th final exam. They were Algebra and Geometry Papers from first semester exam in SSC.
Let me talk about it Marathi.
माझा पहिल्यांदाच वर्गात पहिला नंबर आला होता दहीवीत! काही लोकांना वाटत होत की मटका लागला ह्याचा. दहावीपर्यंत तसं माझ्या कामगिरीत सातत्य नव्हतंच. मला पण स्वतःला आश्चर्य वाटलं होत की माझा पहिला नंबर कसं आला? तसं थोडा pressure पण आला होत. मी विचार केला की जसा इतके वर्ष देतोय पेपर तसं देईन. आता सहामाही परीक्षेमध्ये माझा नशीब नेहमी खराब असायचा. गेल्याच वर्षी नववीत मी पहिल्यांदा सहामाहीत ८० टक्क्याच्या वरती मार्क मिळवले होते. पेपर आले नि गेले. गणिताचे दोन पेपर बाकी होते. बीजगणित मध्ये होता एका दिवशी आणि भूमिती शेवटला. बीजगणिताच्या पेपरला मी ठरवलेली strategy वापरली. पहिल्या दीड तासात पहिले ४ प्रश्न. नंतर पुस्तकातला ड गट अर्धा तास आणि बाहेरचा ड गट अर्धा तास! पेपर संपवताना घाई झाली थोडी पण पूर्ण केला मी. पेपर संपल्यावर एकेकाचे चेहरे पडले होते. जीतुचा पण पेपर पूर्ण झालं नव्हता. कोणीच शेवटचा १५ मार्कांचा प्रश्न सोडवला नव्हता (किरण आणि मी सोडून). भूमितीच्या पेपर ला पण हेच झाले. मला स्वतःलाच काळात नव्हतं की मी चुकीचा प्रश्न तरी नाही ना सोडवला! इतका फरक कसं असेल आमच्यात! पेपर आम्हाला मिळाले आणि मला विश्वासच बसत नव्हतं माझ्या मार्कांवर. मला दोन्ही मध्ये ७४ गुण मिळाले. टोटल १४८/१५०. माझ्या नंतर किरण १३० odd. आणि त्यानंतर सरळ १२० च्या खालती सर्व. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. मला पहिल्यांदा वाटलं की माझ्यात काहीतरी स्पेशल आहे. माझ्या अभ्यासातला आत्मविश्वास बराच वाढला. Actually, ती फिलिंग इथे तंतोतंत सांगणं कठीण. माझ्या त्या कामगिरीचा श्रेय मी चव्हाण सर आणि घरत सरांना देईन :)
Comments