हा dialogue माझ्या आवडत्या मालिकेतील आहे. मालिका आहे "राजा शिवछत्रपती". जेव्हा आदिलशाही दरबारात शिवाजी राजांना धरण्याचा विडा ठेवला जातो, तेव्हा कोणीही उमराव विडा उचलण्यास तयार होत नाही. तेव्हा अली आदिलशहाची आई, बडी बेगम, शहाजी राजांना विचारते की शिवाजीस पकडण्यास कोणीही का धजत नाही. तेव्हा शहाजी राजे म्हणतात, "जसे मध्यान्हीचा सूर्य उघड्या डोळ्यांनी पाहणे अशक्य, जशी बंदुकीतून सुटलेली गोळी चिमटीतून पकडणे अशक्य, जसे नदीचे पाणी मुठीत पकडणे अशक्य, तसे शेर शिवाजीस धरणे अशक्य!!!!" अविनाश नारकरने की म्हटला आहे हा dialogue!!!! जर तो एपिसोड कधी मिळाला you tube वर तर नक्की बघा :)