गेल्या महिन्यात मी "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" सिनेमा पहिला. इतक्या वर्षातला हा माझा पहिला मराठी चित्रपट जो मी सिमेनागृहात पहिला. तसा मी सिनेमागृहात काही जास्त चित्रपट पाहत नाही. माझ्या B. E. च्या चार वर्षात मी फक्त एकदा माझ्या क्लास मधील मित्रांबरोबर सिनेमाला गेला होतो (The Matrix Revolution).
"मी शिवाजी..." बद्दल बोलायचे झाले, तर मी म्हणेन, छान चित्रपट आहे. विशेषकरून विराज, हर्षद आणि सुस्मित बरोबर बघायला आणखी मजा आली. सेन्ट्रल प्लाझा शिवाजींच्या एन्ट्री ला इतका गजबजला कि विचारू नका. मला सर्वच व्यक्तिरेखा आवडल्या. सचिन खेडेकर is at his his best!!! महेश मांजरेकर शिवाजी म्हणून शोभतो, पण अफझल खानाच्या वधाच्या वेळी शिवाजींचे वय इतके नव्हते. तो फार वयस्कर वाटतो त्या प्रसंग साठी. आणि हो गाणी पण छान होती. ते "हे राजे" गान अंगात स्फूर्ती आणते.
खरी मजा आली ती विराज, सुस्मित आणि हर्षद च्या कमेंट्समुळे, आणि मकरंद अनासपुरेच्या रायाबाने !!! रायाबाच्या तोंडी लेखकाने असे काही डाय्लोग्स दिले आहेत. "कावळ्याला दिला कारभार, आणि त्याने घाणीने भरला दरबार", "हातभार गजरा, आणि गावभर नजरा"!!!!
विराजचा best कमेंट माझ्या मते जीजाबैन्च्या एन्ट्री वर आला. रीमा लागू जेव्हा जीजाबाई म्हणून दिसली तेव्हा आमच्या मागची मुळे शिट्या वाजवू लागली. तर विराज म्हाणाला, "जिजाउना शिट्या!!!"
इंद्र जिमि जंभ पर… बाडव सुअंभ पर… रावण सदंभ पर… रघुकुलराज है ! पौन बारिबाह पर… संभु रतिनाह पर… ज्यों सहसबाह पर… राम द्विजराज है ! उदरात माउली… रयतेस साउली… गडकोट राउळी… शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा… युक्तीची यंत्रणा… खल दुष्टदुर्जना… प्रलयंकर हा संतास रक्षितो… शत्रू निखंदतो… भावंडभावना… संस्थापितो ऐसा युगेयुगे… स्मरणीय सर्वदा… माता-पिता-सखा… शिवभूप तो दावा दृमदंड पर… चीता मृगझुंड पर… भूषन वितुंड पर… जैसे मृगराज है ! तेज तम अंस पर… कान्ह जिमि कंस पर… त्यों मलिच्छ बंस पर… सेर सिवराज है ! जय भवानी, जय शिवाजी ! Thanks to Nik for sending this. In case any of you want to read the whole poem you can visit this link .
Comments