हा dialogue माझ्या आवडत्या मालिकेतील आहे. मालिका आहे "राजा शिवछत्रपती". जेव्हा आदिलशाही दरबारात शिवाजी राजांना धरण्याचा विडा ठेवला जातो, तेव्हा कोणीही उमराव विडा उचलण्यास तयार होत नाही. तेव्हा अली आदिलशहाची आई, बडी बेगम, शहाजी राजांना विचारते की शिवाजीस पकडण्यास कोणीही का धजत नाही. तेव्हा शहाजी राजे म्हणतात, "जसे मध्यान्हीचा सूर्य उघड्या डोळ्यांनी पाहणे अशक्य, जशी बंदुकीतून सुटलेली गोळी चिमटीतून पकडणे अशक्य, जसे नदीचे पाणी मुठीत पकडणे अशक्य, तसे शेर शिवाजीस धरणे अशक्य!!!!" अविनाश नारकरने की म्हटला आहे हा dialogue!!!! जर तो एपिसोड कधी मिळाला you tube वर तर नक्की बघा :)
इंद्र जिमि जंभ पर… बाडव सुअंभ पर… रावण सदंभ पर… रघुकुलराज है ! पौन बारिबाह पर… संभु रतिनाह पर… ज्यों सहसबाह पर… राम द्विजराज है ! उदरात माउली… रयतेस साउली… गडकोट राउळी… शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा… युक्तीची यंत्रणा… खल दुष्टदुर्जना… प्रलयंकर हा संतास रक्षितो… शत्रू निखंदतो… भावंडभावना… संस्थापितो ऐसा युगेयुगे… स्मरणीय सर्वदा… माता-पिता-सखा… शिवभूप तो दावा दृमदंड पर… चीता मृगझुंड पर… भूषन वितुंड पर… जैसे मृगराज है ! तेज तम अंस पर… कान्ह जिमि कंस पर… त्यों मलिच्छ बंस पर… सेर सिवराज है ! जय भवानी, जय शिवाजी ! Thanks to Nik for sending this. In case any of you want to read the whole poem you can visit this link .
Comments